Posts

Showing posts from October, 2018
बळीराजासाठी एक दिवस      बळीराजा म्हणजे आपला शेतकरी. शेतात काम करून , घाम गाळून मोत्याचे दाणे पिकवणारा अन्नदाता.आम्ही लहान असताना शाळा सुरु झाली कि पाऊस सुरु होत असे आणि पावसातून भिजत जातानाचा आनंद काय वर्णावा ! शेतामधून वाट काढत काढत शाळेकडे जाताना त्या अन्नदात्याचे साक्षात दर्शन घडे.मस्त आनंदात जात असताना त्या शेतकऱ्याबद्दल कमालीचा आदर वाटत असे. पण आज मात्र चित्र बदललेले दिसते. शेतीबद्दल मुलांच्या मनात अनास्था दिसून येऊ लागली आहे. पूर्वी आम्हाला पावसाची लावणीसाठी १५ दिवसांची सुट्टी असे. त्यावेळी आमच्या शेतीत काम करताना, घाम गाळताना भान हरपून जात असे. पण आताच्या मुलांना ती संधी मिळेनाशी झाली आहे. बरेचसे पालक आपल्या मुलांना घेऊन शहराकडे रवाना झाले आहेत. शेती टाकून पैसे मिळवण्यासाठी मुंबईसारख्या शहरात स्थायिक होऊ लागले आहेत. अर्थातच त्याचे आपल्या गावाकडे येणेही खूप अंशी कमी झाले आहे.पर्यायाने मुलांना शेतीविषयी प्रेम वाटणेही कमी होत चालले आहे.     यावर काही प्रमाणात मात करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सन २०१८ या वर्षी “ बळीराजासाठ...
माझा गाव , स्वच्छ गाव माझा गाव आहे मांगवली. माझा गाव मला खूप आवडतो.मांगवली गाव म्हणजे एक प्रकारे विकासाचेच नाव आहे. गावात जाल तेथे तुम्हाला“ स्वच्छतेच्या घरी” आल्यासारखे वाटत राहील. स्वच्छता आमच्या गावातील प्रत्येकाच्या अंगांगात भिनली आहे. ती आता आमच्यासाठी जणू सेवाच बनली आहे. स्वच्छतेचे हे व्रत, हा वसा जपत जपतच मांगवलीतील प्रत्येक ग्रामस्थ आपला गाव स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्नशील असतो. गावात जी सार्वजनिक ठिकाणे आहेत त्यामध्ये मंगेश्वर मंदिर, रवळनाथ मंदिर, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी येथे गेलात तर तुम्ही म्हणाल कि खरंच या गावातील लोक किती सामाजिक स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देवून स्वच्छता पाळतात ते. शालेय इमारती सुशोभित तर आहेतच , परंतु दरवर्षी आमच्या गावाला किंवा शाळेला स्वच्छतेचा एक तरी पुरस्कार मिळतोच मिळतो. आमच्या गावातील मांगवली नं. १ शाळेला सानेगुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धेमध्ये “ स्वच्छ शाळा “ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रत्येकजण स्वच्छतादूत बनून गावात स्वच्छतेसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सर्व शाळांमधील विद्यार्थी स्वच्छतादूत बनून प्...
Image

माझी शाळा मांगवली नं. १

Image
वैभववाडी तालुक्यातील एक गाजलेली व सर्व सोयींनी युक्त असलेली आमची मांगवली नं. १ शाळा

आमची शाळा स्वच्छ शाळा

Image